×

27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासंकल्पनेतून उदयास आलेल्या एकविरा फाऊंडेशन मार्फत 27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले ,सदर प्रशिक्षणामध्ये विविध शोभेच्या रांगोळ्या व तोरणं महिलांना शिकविण्यात आले,ह्या प्रशिक्षणासाठी त्या कलेचे ज्ञान असलेले प्रशिक्षक बोलविण्यास आलेले होते.

एकविराचे महिलांना तोरण बनवण्याची प्रशिक्षण

महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून मोत्यांचे तोरण व रांगोळी बनवण्याची प्रशिक्षण कार्यशाळा आज संपन्न झाली.

एकविरा फाऊंडेशनच्या 300 युवक युवतींनी केली गणपती निर्माल्याची साफसफाई

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसचे मा.प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 300 युवक - युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा काठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले.

एकविराच्या वतीने संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया

एकविराच्या वतीने संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया संगमनेर ( प्रतिनिधी ) नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील युवती व महिलांसाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत यशोधन कार्यालयाजवळील प्रांगणात मोफत भव्य दांडीया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.