×
एकविरा फाऊंडेशनच्या 300 युवक युवतींनी केली गणपती निर्माल्याची साफसफाई

10/09/2022

एकविरा फाऊंडेशनच्या 300 युवक युवतींनी केली गणपती निर्माल्याची साफसफाई

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसचे मा.प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 300 युवक - युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा काठी निर्माल्यगोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले.




grid-d307837b-df73-44fa-861f-407ce7cbcf911664785200.jpg





गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे व इतर गणपती, घरगुती गणपती प्रवरा नदीकाठी विसर्जित करण्यासाठी आलेले असतात काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे व शहराच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा युवक - युवती फाउंडेशनच्या वतीने नदीकाठी साफ सफाई अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत प्रवरा नदीकाठी असलेल्या गंगामाई घाटाच्या ठिकाणी, म्हाळूंगी नदीच्या काठी गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणी या युवक - युवतींनी निर्माल्य गोळा केले.  यामध्ये 300 युवक - युवतींनी सहभाग घेतला.५० - ५० च्या गटाच्या युवतींनी वेगळ्या ठिकाणी उभे राहून हे निर्माल्य गोळा केले. येणाऱ्या भाविकांना प्रवरेच्या पुराची माहिती सांगून आपण सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावे. तसेच गणेश विसर्जन सुद्धा नगर परिषदेने केलेल्या तळ्यामध्ये करावे यासाठी सुद्धा विनंती केली. यामुळे अनेक शहरातील नागरिकांची सोय झाली.

यावेळी डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, कोरोनाच्या दोन वर्ष संकटानंतर यावर्षी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. आपण गेली दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. आज गणपती बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाला दुःख होत आहे. परंतु ही परंपरा आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन आपण करत असतो. त्यानुसार प्रवराकाठी असलेल्या तळ्यांमध्ये अनेकांनी गणेश विसर्जन केले. शहरातील विविध नागरिकांनी आलेल्या गणेशाच्या निर्माल्याचे आम्ही कोरडे निर्माल्य व ओले निर्माल्य असे वेगळे करून एकत्रित केले व त्याची विल्हेवाट लावली.

अनंत चतुर्थीच्या दिवशी युवतींनी पुढाकार घेत निर्मले गोळा केल्याने मलाही खूप आनंद झाला. समाजामध्ये अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा फैलाव होत असून स्वच्छता हाच चांगल्या आरोग्यासाठी मोठा मूलमंत्र असल्याचेही डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 

चौकट

शहरातील नागरिकांनी अतिशय शांततेत व उत्साहात गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्या. यावेळी ढोल ताशाचा गजर व तरुणाईचा जल्लोष यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. गणेश विसर्जन व निर्माल्य एकत्र गोळा करुन प्रवरा नदीकाठ स्वच्छ ठेवणे कामी व विविध युवा संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला हे कौतुकास्पद असून सर्व नागरिकांचे व नगरपालिकेचे कौतुक केले आहे.