×
एकविराचे महिलांना तोरण बनवण्याची प्रशिक्षण

एकविराचे महिलांना तोरण बनवण्याची प्रशिक्षण...

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून मोत्यांचे तोरण व रांगोळी बनवण्याची प्रशिक्षण कार्यशाळा आज संपन्न झाली.


grid-whatsapp-image-2023-08-21-at-1309181692607420.jpg

यशोधन जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील व शहरातील महिलांना मोत्यांचे तोरण व रांगोळी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात नाशिक येथील प्रशिक्षणतज्ञ भावनाताई बच्छाव, मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

महिलांना स्वयंरोजगार किंवा गृह उद्योग करता यावा याकरता 100 महिलांना मोत्यांचे तोरण बनवण्याचे व रांगोळी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.



यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. या विकासात महिलांचेही मोठे योगदान असून अनेक महिला या गृह उद्योग व स्वयंरोजगार करू इच्छितात त्यांना मोत्यांचे तोरण बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शास्त्रीय पद्धतीने या नवीन कलाकृतीतून अनेक महिलांना नक्कीच फायदा होईल असे त्या म्हणाल्या.


grid-whatsapp-image-2023-08-21-at-130918521692607422.jpg

तर भावना बच्छाव म्हणाल्या की, डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून महिलांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून यामधून अनेक उद्योजिका तयार होतील अशा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.
grid-whatsapp-image-2023-08-21-at-1309171692607418.jpg



grid-whatsapp-image-2023-08-21-at-1309161692607417.jpg
https://m.facebook.com/story.php?story_fbid=774210538046071&id=100063713965207&mibextid=Nif5oz