×
एकविराच्या वतीने संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया

02/10/2022

एकविराच्या वतीने संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया

संगमनेर (प्रतिनिधी) नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील युवती व महिलांसाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत यशोधन कार्यालयाजवळील प्रांगणात मोफत भव्य दांडीया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

नवरात्र उत्सवातील दांडिया स्पर्धा हा कार्यक्रम संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा आहे. मागील पाच वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्रींच्या उपस्थितीत भव्य दिव्य दांडिया स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत.यावर्षी मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत या दांडिया स्पर्धा होणार आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ.कांचनताई थोरात, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, सौ.शरयूताई देशमुख यांसह शहरातील विविध मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत.

या दांडिया स्पर्धांसाठी भव्य दिव्य मैदान, आकर्षक स्टेज व्यवस्था, साऊंड सिस्टिम, विद्युत रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, सुंदर बैठक व्यवस्था, सामुहिक गायन व नृत्य व्यवस्था असणार आहे. या दांडिया स्पर्धांमधील समूहांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.तरी या मोफत दांडीया स्पर्धेमध्ये तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.